रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

अजूनही वेळ गेलेली नाही

वडील जाणून घ्यायचे आहेत ?
चार मिनिटे वेळ काढून वाचाच !!!!!!!!

*****************
आलिशान दिवाणखान्यात ऐंशी वर्षाचे वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले,  पलीकडे डायनिंगवर त्यांचा चाळीस वर्षाचा मुलगा पेपर वाचत नाष्टा करतोय. तिथेच दहा वर्षाचा नातूदेखील वडिलांसोबत नाश्ता करतोय. इतक्यात खिडकीत एक कावळा येऊन बसतो.
वृद्ध वडील आपल्या चाळीशीच्या मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?"
मुलगा चकित होतो, की वडिलांना इतके पण माहीत नाही ? की माझी फिरकी घेताहेत ??
पण जाऊ द्या, असे म्हणत मुलगा शांतपणे उत्तर देतो, "बाबा, तो कावळा आहे"
***
दोन मिनिटे जातात. तो कावळा "काव काव" ओरडतो. यावर वृद्ध वडील पुन्हा मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?"
आता थोडा वैतागून मुलगा म्हणतो, "अहो ssss तो कावळा आहे"
***
पाच मिनिटे जातात. पुन्हा वडील  मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?"
आता हातातला पेपर बाजूला करून, मुलगा चिडून म्हणतो, "कितीदा सांगू ? की तो कावळा आहे म्हणून ? "
***
यावर पुन्हा दोन चार मिनिटे गेल्यावर पुन्हा वडील  मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?"
यावर मात्र मुलाचा संयम संपतो. तो हातातला पेपर ताड्कन फेकून वडिलांना जोरात म्हणतो, "चार वेळा तुम्ही विचारलंय आणि मी सांगितलंय की तो कावळा आहे. आता मला पेपर वाचू देणार आहात की नाही ? की जाऊ बाहेर ?"

***
वृद्ध वडील हळूच उठून आतल्या त्यांच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसतात. समोर ते नेहमी लिहीत असलेली रोजची डायरी असते. त्यातले एक पान काढून वाचत असतानाच त्यांचा लाडका नातू हळूच तिथे येतो. आजोबाच्या मागून तोही डायरी वाचू लागतो. आणि अचानक पुढे होऊन ती डायरी उचलून तो पळत बाहेरच्या खोलीत वडिलांकडे येतो. त्या डायरीतील "ते" पान वडिलांसमोर धरतो. वडील वाचू लागतात....
***
"सकाळी पेपर वाचत असताना आज माझा 6 वर्षाचा मुलगा मांडीवर येऊन बसला. समोरच्या झाडावर एक कावळा येऊन काव काव करू लागला. मुलाने मला चोवीस वेळा विचारले की ते काय आहे ? कोणता पक्षी आहे ? आणि मीही हातातला पेपर बाजूला करून चोवीस वेळा त्याला उत्तर दिले. आणि प्रत्येक वेळी मी त्याला उत्तर दिल्यावर जवळ घेऊन पापा देत गेलो. यात आमचा अर्धा तास खूप छान गेला !!"
*****
डायरीतील पुढची अक्षरे धूसर होत गेली. कारण चाळिशीतल्या त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ते थेंब डायरीच्या पानावर पडत होते !!

**********
वृद्धपण म्हणजे जणू दुसरे बालपण असते. म्हणून आपण ज्यांच्यामुळे घडलो, मोठे झालो, त्या वडिलांना त्यांच्या वृद्धपणी "लहान" समजून वागवले तर घराघरात सध्या पेटलेले वाद निम्म्याने कमी होतील. नात्यात जीवन जन्मते  आणि जीवनात नाती फुलतात. म्हणून नात्याला जपायचं !!..

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

महत्व आई वडिलांचे !

आई-वडील
* * * * * *

० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

० "आई" तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

० आणि कधी "नेटवर्क" थकले;
तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरू असतो...!!!

० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं...!!!

०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं...!!!

उगाच नाही आपल्या संस्कृतीत
   ०"मातृ देवो भव" अन् "पितृ देवो भव" म्हणलेलं असतं...

नवरात्र स्पेशल

*नवरात्र....आणि नवरात्रीचे नऊ रंग*

*1)पहिला रंग*- स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

*2)दुसरा रंग* मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

*3)तिसरा रंग* आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

*4)चौथा रंग* मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

*5)पाचवा रंग* महिलांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

*6)सहावा रंग* पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

*7)सातवा रंग* स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

*8)आठवा रंग* विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

*9)नववा रंग* "स्त्री पुरुष समानता" ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या...

जगाने हे रंग पाळले तर
आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील.
मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल.
सोने लुटावे लागणार नाही....
तर आपल्या आयुष्याचेच सोने होईल !
सादर
भंडारी क्लब परिवार