मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

आयुष्यातले रम्य क्षण...


अडगळीच्या खोलीमधलं
दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||

लहानपणी मी खुप श्रिमंत होतो
कारण....
या पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझे पण
२,३ जहाज चालायचे ।।
आता हरवली ती श्रिमंती
आणि हरवले ते बालपण...

रविवार, २६ ऑक्टोबर, २०१४

मेत्री प्रेमाची...

मैत्री केली आहेस म्हणुन...

मैत्री केली आहेस
म्हणुन तुला सांगावसं वाटतंय...

गरज म्हणुन नातं कधी जोडू नकोस...
सोय म्हणुन सहज असं तोडू नकोस...
रक्ताचं नाही म्हणुन कवडीमोल ठरवु नकोस...

भावनांचं मोल जाण, मोठेपणात हरवु नकोस...
विश्वासाचे चार शब्द, दुसरे काही देऊ नकोस...
जाणीवपुर्वक नातं जप, मधेच माघार घेऊ नकोस...

खास आपल्यासाठी  चारोळ्या

चमकणाऱ्या काजव्यांना 
रात्रीचा अंधार घालवता येत नाही 
आणि त्या रात्रीला देखील 
काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही 

रातराणीचं आयुष्य म्हणतात 
एका रात्रीचं असतं 
एका रात्रीचं असल तरी 
मोठ्या खात्रीचं असतं

इथे प्रत्येकाला वाटते 
आपण किती शहाणे 
यावर उपाय एकच 
सर्व शांतपणे पाहणे 

इथे प्रत्येकाला 
प्रत्येकाचा भूतकाळ आहे 
मला जगानं खूप छळलं 
हा प्रत्येकाचा आळ आहे

जमिनच हरवली तर 
मुळांनी कुंज्यायाच ?
ज्यांचा जीवावर फुलायचं 
ते पाणी कोठून आणायचं 

जमिनीतले पाणी मिळते 
मूळ तेव्हा रुजते 
निष्पर्ण झाडावर प्रेम बसरते 
तेव्हा त्यालाही पालवी फुटते

सौजन्य:भंडारी क्लब.

छत्रपति संभाजी महाराज की जय..

छत्रपती संभाजी महाराज
ऊंची = 7.5 फुट.
वजन= 170 ते 200 किलो.
छाती=75
तलवार=4 फुट लांब आणी 65 किलो वजन.
जेवन= फक्त नाश्ता 12 भाकर्यांचा 2 लिटर दुध.
लढाई = 128 युद्ध कधी ही नहरता.500
ते 1000 सैन्य एकटे मारुन टाकायचे.
कारणामे = वाघ सिंह फाडुन टाकला.
... आहे का आज असा कोणी......
छत्रपती संभाजीराजाना मानाजा मुजरा.......
धूम 3 साठी 900/ रु. खर्च  करता....जय हो पण पहायला जाणार.... !!! पण लक्षात ठेवा..... हिन्दू धर्मासाठी बलिदान देणार्या धर्मवीर छत्रपती संभाजी -1689🚩
हा चित्रपट येत्या 17 जानेवारी 2015 ला प्रदर्शित
होणार आहे,
पण; महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दुर्दैव कि,
त्याची जाहिरात सुद्धा दाखवली जात नाही.

पण आम्ही तमाम हिन्दू मराठी... याची जाहिरात करणार..👉
🚩🚩🚩
तूम्ही जर कट्टर हिंदू आणी कट्टर मराठा असाल तर या चित्रपटाची जाहिरात नक्की कराल ✌🚩

संपली दीपावली



मी दीपावली, आता मी तुमची रजा घेतेय.... जवळ जवळ सगळी आवराआवर झालीय...तुमचा निरोप घ्यायची वेळ आलीय...
💥 आता तुमच्या जवळील सारा (शोभेचा) दारुगोळा आत ठेउन द्या...
   आता भेटू पुढच्या वर्षी ११ नोव्हें २०१५, बुधवारी....
💫🌞 तोपर्यंत तुमचा चेहरा उजळलेला राहू दे, हृदय तेजाने भरुन राहु
                   दे, तुमची आत्मोन्नति उन्मलित होऊ दे..... या शुभेच्छांसहीत मी
                   आपला निरोप घेतेय....
                   
                   ।। शुभमस्तु ।।



प्रेमा ला वय नसते


प्रेमाला कधीच वय नसतं...

फुलपाखरू फुलाला विचारतं का वय...
कमळाना भ्रमराच वाटतं का कधी भय...
गोड-गुलाबी मनाला मुळीच भय नसतं...
आणि म्हणुन अशा या प्रेमाला कधीच वय नसतं...!

नमस्कार

 "नवरा बायकोचं नातं हे करंजी सारख असावं, गोड आणि खुसखुशीत. नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण ..!!

संसारात कितीही अडचणी आल्या, काही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणानं झेलायचे, मनस्तापाचं काटेरी चाक स्वत:च्या अंगावर फिरवुन घ्यायचं, तापत्या तुपात स्वत:ला पोळुन घ्यायचं, मात्र कुठेही आतल्या सारणाला धक्का लागता कामा नये, सारण अबाधित राहिलं पाहिजे, तरच गोड करंजी खायला मिळते."

अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात नवरा बायकोच नातं एवढ्या ताकदीने उभं करणारे आणि संसार सुखी करण्याचे मंत्र देणारे व.पु. ग्रेटच !!