गुरुवार, १८ डिसेंबर, २०१४

आयुष्य म्हणजे खुप काही, कदाचित थोडस !

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी…!
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोप असतं…
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असतं…
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात…
तोंड देता आले तर
संकट ही शुल्लक असतं…
वाटायला गेलं तर
अश्रूंत ही समाधान असतं…
पचवायला गेलं तर
अपयश ही सोपं असतं…
हसायला गेल तर
रडणेही आपल असतं…
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं…
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.
पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,
यावर आपलं यश
अवलंबून असतं...
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

अश्रु नसते डोळ्या
मधे तर डोळे इतके
सुंदर असले नसते..!
दुःख नसते ह्रदयात तर
धडकत्या ह्रदयाला काही
किंमत उरली नसती..!
जर पुर्ण झाल्या असत्या
मनातील सर्व इच्छा तर
भगवंताची काहीच गरज
उरली नसती..!!
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

आयुष्य पण हॆ
एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची
काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या
हातात असते.
🔹🔹🔹🔹🔸🔸🔸🔸

आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..
🔸🔸🔸🔸🔸🔹🔹🔹 कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

आयुष्य थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं, आयुष्य
थोडंच जगावं पण..जन्मो-
जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम
असं द्यावं की..घेणा-याची
ओंजळ अपुरी पडावी, मैत्री
अशी असावी की..स्वार्थाचं
ही भानं नसावं, आयुष्य असं
जगावं की..मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर...
🔸🔸🔸🔸🔸

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

श्री गुरुदेव दत्त ।

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ
१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’
याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक
जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव
आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण
प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव
जागृत करण्याचा आपण निश्चय करूया..
२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास
करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास
करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण
‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच
आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट
करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’
३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे
असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व
दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर
ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य
जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच
आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….’
*******************************
दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय
ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू
आपणाला जे हवे, ते सर्व देते.
पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४
वेदांचे प्रतीक आहेत.…
६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व
अधिक आहे.…
७] मूर्तीविज्ञान
दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे
आहे
८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…
९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…
१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…
११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन
दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.