गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

जाणतो मराठी बोलतो मराठी ।

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी 
धर्म पंथ जात एक जानतो मराठी 
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी 
बोलतो मराठी ऎकतो मराठी 
जानतो मराठी मानतो मराठी 

आमच्या मना मनात दंगते मराठी 
आमच्या रगा रगात रंगते मराठी 
आमच्या मना मनात दंगते मराठी 
आमच्या रगा रगात रंगते मराठी 
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी 
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥ 

आमच्या पिलापिलात जन्मते मराठी 
आमच्या लहानग्यात रांगते मराठी 
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी 
आमच्या घराघरात वाढते मराठी 
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी 
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी 
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी 
येथल्या नगा नगात गर्जते मराठी 
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी 
येथल्या वनावनात गुंजते मराठी 
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी 
येथल्या वनावनात गुंजते मराठी 
येथल्या तरुलतात साजते मराठी 
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥ 

येथल्या नभामधुन वर्षते मराठी 
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी 
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी 
येथल्या चराचरात राहते मराठी॥ 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी 
बोलतो मराठी ऎकतो मराठी 
जानतो मराठी मानतो मराठी 
दंगते मराठी... रंगते मराठी.. 
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. 
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी ||

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

मोठे होण्याचे फायदे तसेच नुकसान ।

जेंव्हा “निष्पापपणा”..
हा स्वाभाविक असायचा…

जेंव्हा “पिणे” म्हणजे
फक्त रसना असंच माहित होतं…

जेंव्हा “बाबा” हे
एकमेव हिरो वाटायचे..

जेंव्हा “प्रेम” म्हणजे
आईची ती मिठी/ झप्पी असंच माहित होतं…

जेंव्हा “बाबांचे खांदे”
म्हणजे जगातील सर्वात उंच गोष्ट वाटायची…

जेंव्हा “वाईट – शत्रु”
म्हणजे आपली खट्याळ भावंडं वाटायची…

जेंव्हा “ड्रामा”
फक्त नाटकातच होतो असं वाटायचं…

जेंव्हा “वाया गेला” असं कुणी म्हणायचं
तेंव्हा “वेळ” हेच अभिप्रेत असायचं…

जेंव्हा “औषध”
म्हणजे फक्त खोकल्यावरच
असतं असं वाटायचं…

जेंव्हा “तोडा – तोडी” व्ह्यायची
ती फक्त खेळण्यांची…

जेंव्हा “दुखणारी गोष्ट”
म्हणजे ते फुटलेले गुडघे असायचे…

जेंव्हा “गुडबाय”
फक्त उद्यापर्यंत असायचा…

जेंव्हा “गेटींग हाय”
म्हणजे झुल्यावर/ झोक्यावर
झुलणे असंच माहित होतं…

जेंव्हा “युद्ध – लढती” फक्त खेळातच असतात
असं वाटायचं…

आयुष्य कीती सरळ – सोप्पं
होतं…

आणि – मला मोठं व्हायचं होतं..
😥😥

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

जमीन खरेदी विक्री साठी अतिशय महत्वाची माहिती

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.    ग्रामपंचायत 
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.

✳ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :

१. भूविकास
२. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
३. जमिनीचे एकत्रीकरण
४. मृदुसंधारण
५. लघु पाट बंधारे
६. सामाजिक वनीकरण
७. घर बांधणी
८. खादी ग्रामोद्योग
९. कुटिरोद्योग
१०. रस्ते, नाले, पूल
११. पिण्याचे पाणी
१२. दळण वळणाची इतर साधने
१३. ग्रामीण विद्युतीकरण
१४. अपारंपरिक उर्जा साधने
१५. दारिद्रय निर्मुलन
१६. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
१७. बाजार आणि जत्रा
१८. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
१९. महिला आणि बालविकास
२०. प्रौढ शिक्षण
२१. सांस्कृतिक कार्यक्रम
२२. सार्वजनिक वितरण
२३. उत्पादनाच्या बाबी

✅ग्रामपंचायतींची कार्ये:

१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते
आय पी सी (IPC) १८६०

कलम १४- शासकीय सेवक
कलम २१ -लोकसेवक
कलम २२- जंगम मालमत्ता
कलम २३ -गैर्लभ किंवा गैर्हानी 
कलम २४ -अपप्रमनिक्पने
कलम २५ -कपतिपनने
कलम २६- समजण्यास कारण
कलम २८- बनवतीकर्ण किंवा नकलीकरन
कलम २९- दस्त्ताइवज
कलम २९ (अ) -वीदूत नोंदी
कलम ३० -मुल्य वान रोखा
कलम ३३ -कृती अकृती
कलम ३४- सामाईक इरादा
कलम ३९ -आपखुशीने कींवा इचापुर्वक
कलम ४० -अपराध
कलम ४१- वी शे श  कायदा
कलम ४२ -थानीक कायदा
कलम ४४ -श ती / हानी
कलम ५२ -सद्भावनेने / शुद्ध हेतूने
कलम ५२ (अ) -आसरा देणे

                   आपवाद
कलम ७६ -कायदेशीर बांधील असलेल्या        व्यक्तीने आथवा तथ्ये विषयक चुक्भूलीमुळे केलेली कृती अपराध होत नाही
कलम ८२ -सात वर्ष वयाखालील बालकाने केलेली कृती
कलम ८३ -सात वर्षावरील व बारा वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती आसलेल्या बालकाने केलेली कृती
कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेली गोष्ट
कलम ९७ -शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क
कलम १०० -शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृतु घडून आणण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०१ -आसा हक्क मृतुहून अन्य अपाय करण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०२-शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरु होणे व चालू राहणे
    
             अप्प्रेर्णा वीषयी
कलम १०७- एखा द्या गोष्टीचे अप्प्रेरन
कलम १०८- अप्प्रेरक
कलम १०९- अपप्रेरणामुळे परीणामतः
कलम ११४- अपराध घडला तेंव्हा अपप्रेरक हजार आसने

     सार्वजनीक प्रशान्त्तेच्या वीरोधी अपराधा वीषयी
कलम १४१- बेकायदेशीर जमाव
कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक आसने
कलम १४३- शीक शा
कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासः बेकायदेशीर जमावात सामील होणे
कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश झाल्याचे माहीत असूनही सामील होणे
कलम १४६- दंगा करणे
कलम १४७- दंगा करण्याबद्दल शी शा
कलम १४९- वीधी नी युक्त  जबाबदारी
कलम १५१- पाच कींवा आधीक व्यक्तींना पंग्न्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक थांबून राहणे
कलम १५३(अ) -धर्म,वंश,जन्म्थन,नीवास भाषा इ. कारणावरू