रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

अजूनही वेळ गेलेली नाही

वडील जाणून घ्यायचे आहेत ?
चार मिनिटे वेळ काढून वाचाच !!!!!!!!

*****************
आलिशान दिवाणखान्यात ऐंशी वर्षाचे वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले,  पलीकडे डायनिंगवर त्यांचा चाळीस वर्षाचा मुलगा पेपर वाचत नाष्टा करतोय. तिथेच दहा वर्षाचा नातूदेखील वडिलांसोबत नाश्ता करतोय. इतक्यात खिडकीत एक कावळा येऊन बसतो.
वृद्ध वडील आपल्या चाळीशीच्या मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?"
मुलगा चकित होतो, की वडिलांना इतके पण माहीत नाही ? की माझी फिरकी घेताहेत ??
पण जाऊ द्या, असे म्हणत मुलगा शांतपणे उत्तर देतो, "बाबा, तो कावळा आहे"
***
दोन मिनिटे जातात. तो कावळा "काव काव" ओरडतो. यावर वृद्ध वडील पुन्हा मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?"
आता थोडा वैतागून मुलगा म्हणतो, "अहो ssss तो कावळा आहे"
***
पाच मिनिटे जातात. पुन्हा वडील  मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?"
आता हातातला पेपर बाजूला करून, मुलगा चिडून म्हणतो, "कितीदा सांगू ? की तो कावळा आहे म्हणून ? "
***
यावर पुन्हा दोन चार मिनिटे गेल्यावर पुन्हा वडील  मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?"
यावर मात्र मुलाचा संयम संपतो. तो हातातला पेपर ताड्कन फेकून वडिलांना जोरात म्हणतो, "चार वेळा तुम्ही विचारलंय आणि मी सांगितलंय की तो कावळा आहे. आता मला पेपर वाचू देणार आहात की नाही ? की जाऊ बाहेर ?"

***
वृद्ध वडील हळूच उठून आतल्या त्यांच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसतात. समोर ते नेहमी लिहीत असलेली रोजची डायरी असते. त्यातले एक पान काढून वाचत असतानाच त्यांचा लाडका नातू हळूच तिथे येतो. आजोबाच्या मागून तोही डायरी वाचू लागतो. आणि अचानक पुढे होऊन ती डायरी उचलून तो पळत बाहेरच्या खोलीत वडिलांकडे येतो. त्या डायरीतील "ते" पान वडिलांसमोर धरतो. वडील वाचू लागतात....
***
"सकाळी पेपर वाचत असताना आज माझा 6 वर्षाचा मुलगा मांडीवर येऊन बसला. समोरच्या झाडावर एक कावळा येऊन काव काव करू लागला. मुलाने मला चोवीस वेळा विचारले की ते काय आहे ? कोणता पक्षी आहे ? आणि मीही हातातला पेपर बाजूला करून चोवीस वेळा त्याला उत्तर दिले. आणि प्रत्येक वेळी मी त्याला उत्तर दिल्यावर जवळ घेऊन पापा देत गेलो. यात आमचा अर्धा तास खूप छान गेला !!"
*****
डायरीतील पुढची अक्षरे धूसर होत गेली. कारण चाळिशीतल्या त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ते थेंब डायरीच्या पानावर पडत होते !!

**********
वृद्धपण म्हणजे जणू दुसरे बालपण असते. म्हणून आपण ज्यांच्यामुळे घडलो, मोठे झालो, त्या वडिलांना त्यांच्या वृद्धपणी "लहान" समजून वागवले तर घराघरात सध्या पेटलेले वाद निम्म्याने कमी होतील. नात्यात जीवन जन्मते  आणि जीवनात नाती फुलतात. म्हणून नात्याला जपायचं !!..

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

महत्व आई वडिलांचे !

आई-वडील
* * * * * *

० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

० "आई" तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

० आणि कधी "नेटवर्क" थकले;
तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरू असतो...!!!

० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं...!!!

०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं...!!!

उगाच नाही आपल्या संस्कृतीत
   ०"मातृ देवो भव" अन् "पितृ देवो भव" म्हणलेलं असतं...

नवरात्र स्पेशल

*नवरात्र....आणि नवरात्रीचे नऊ रंग*

*1)पहिला रंग*- स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

*2)दुसरा रंग* मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

*3)तिसरा रंग* आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

*4)चौथा रंग* मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

*5)पाचवा रंग* महिलांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

*6)सहावा रंग* पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

*7)सातवा रंग* स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

*8)आठवा रंग* विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

*9)नववा रंग* "स्त्री पुरुष समानता" ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या...

जगाने हे रंग पाळले तर
आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील.
मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल.
सोने लुटावे लागणार नाही....
तर आपल्या आयुष्याचेच सोने होईल !
सादर
भंडारी क्लब परिवार

शुक्रवार, १२ जून, २०१५

पावसाळयातल्या निसर्गाची छोटीशी ओळख .,

मित्रांनो,
पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.
कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.

- भिवपुरी - माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकर्यांना सांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.

- चिंचोटी - इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील.मुख्य धबधब्याजवळ पोहचायला
सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर ‘कामन’ जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे लागते.

- तुंगारेश्वर - नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.
मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी
डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.

- रांधा फॉल - सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा
धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ
असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.

- पांडवकडा - खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.

- झेनिथ - खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा मोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत
असते. इथल्या प्रत्येक कोपर्यावर पंजाबी धाबे आहेत.

- पळसदरी - मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे.
रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते.
जेवणाची सोय या ठिकाणी होते.

- गाढेश्वर - पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात.

- फणसाड धबधबा - फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.

- सवतकडा - मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास
खाण्याची सोय नाही.

- गवळीदेव - नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासूून वंचित आहे.

- कोंडेश्वर - बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्या असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.

- भगीरथ - वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.

- टपालवाडी - नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’ असे त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.

- आषाणे - भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असणार्या आषाणे गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण करून देतात.

- थिदबीचा धबधबा - पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर
घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी.
कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.

- निवळी - निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी पायर्यांचा मार्ग तयार
करण्यात आला आहे.

- मोहिली धबधबा - कर्जतपासून ६ ते ७ किमीवर उल्हास नदी पार करून मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं, असे वाटते. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही औरच आहे.
लोणावळ्याचे भुशी धरण,त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी
पावसाळ्यात बरेच पर्यटक जातात. इथून जवळच असलेला कोरीगड, तैलबैला,घनगड,
कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड,विसापूर, राजमाची, तुंग,तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक
अविस्मरणीय आनंद देतो.

- माळशेजघाटाआधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो.

- ठाणे जिल्ह्यातील जव्हार म्हणजे डोंगरदर्या, असंख्य धबधबे, दूरवर
पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन. इथला हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा ठिकाण पाहण्यासारखा आहे. कसारा घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे.

- नाशिक त्र्यंबकेेशर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर,
बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या बर्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते.

- ठाणे-नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा आणि याच भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे. इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाता येईल. कळसुबाई,
भंडारदरा आणि रंध धबधब्याला पावसाळ्यात भेट द्या. इथले अमृतेेशर मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. साम्रात गावाजवळील सांधण दरी अप्रतिम आहे. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रेकदेखील करतात.

- धुळे-नंदुरबार इथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे.इथले जंगल, डोंगर, दर्या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न
करून टाकतील यात वादच नाही.

- नाशिकच्या पुढेच असणार्या चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात पर्यटनाचे आणखी काही पर्याय ठरू शकतात. इथे असलेला
कण्हेरगड किल्ला आणि केदारेेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.

- चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासीयांचे आवडते ठिकाण. इथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा यासारखी बरीच ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.चिखलदर्याहून जवळच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्या.

- सातारा जिल्ह्यातलं कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ
फ्लॉवर्स. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले
फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक इथे भेट देतात. कासबरोबरच सातार्याजवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्या माहुली तसेच अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा पाहण्यासारखा आहे.
सातारहून ८ कि.मी. असणार्या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल.

- ट्रेकर्सनी पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. मसाईचे
विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा
ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो.

- पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणार्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा
लगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येईल. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारं छोटंसं गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणारं सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधा घाट उतरल्यावर शिवथरघळ इथली गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस, धबधबा
म्हणजे क्या बात!

- रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी खिंडीजवळ खांबगाव नजीक सुरगड
किल्ल्याला देखील भेट देणं छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीपासून पायवाटेने साधारण २० मिनिटांनंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचं पाणी आणि नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे.

- रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते.दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्गही पर्यटकांना भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात आपले विलोभनीय रूप दाखवते.

त्यासाठी हा निसर्ग रम्य साठा आपण आयुष्यभर नक्कीच जपून ठेवा, धन्यवाद ।

सोमवार, १ जून, २०१५

श्री नथु रामाय नमः

"नथुराम गोडसे याचं मी श्री आफळे गुरुजी याचं कीर्तन ऐकल तेही मोबाईलमध्ये २ दिवस झोप उडाली, डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते, त्यामुळे तुम्ही देखील हि पोस्ट पूर्ण वाचावी हि अपेक्षा करतो मित्रांनो तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला रडवणे हा उद्देश नसून त्या राष्ट्रवीराची कार्याची जाणीव असावी हा उद्देश आहे…।

आफळेजीचं त्यांनी जसा सांगितलं तस हे कीर्तन
"नथुरामायण" हे जर वाचल नाही तर ,,,,,,,,,?मी काय सांगणार ,,?
बस्स ईतकच सांगेन नथूरामजींच

अखंड भारतच स्वप्न साकार कारण हे आपल आद्य कर्तव्य ठराव.

हीच माफक अपेक्षा स्वर्गाची दार आपल्यासाठी उघडली जातील.  
गोष्ट झाली होती अशी,,,,,,,,,,, देश फाडून मागितला इथवर ठीक पण,
१४ ऑगस्ट म्हणजे  १५ऑगस्ट च्या अलीकडचा दिवस हा त्यांनी
त्यांचा क्रांती दिवस मानला....
दिल्लीमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळाली ती,
न्यायमूर्ती कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलीय....
न्यायमूर्ती लिहतात पाकिस्तानहून दिल्लीला ज्या आगगाड्या यायला लागल्या....
त्यात मालाची पोति रचावीत अशी माणसा रचून भारतात यायला लागली..
त्यातली पुष्कळशी आत मेलेलीच होती....
गळा चिरलेली ,,,,,,,,,
आगगाडीच्या छप्रावरती बसून कित्येक माणस आली.
त्या आगगाडीच्या डब्ब्यात फक्त श्वास घेण्यापुरती जागा असायची.....
बैलगाड्या ट्रक हिंदूंच्या माणसांनी भरून येत होत्या..
त्या आगगाडीवर लिहून पाठवल होत "आझादी का तोफा"....
हि प्रेत उचलणं अशक्य होत..
दिल्ली पोलिसांनी खोर्या फाव्ड्यांनी ती प्रेत आगगाडीतून बाहेर काढावीत
ट्रक मध्ये भरावीत आणि कुठल्यातरी लांब असलेल्या पटांगणात जाऊन ,
ती प्रेते रचावीत वरून पेट्रोल चे फवारे लाऊन ती प्रेते पेटवावीत इतकी बिकट अवस्था झाली होती..
प्रचंड दुर्गंधी..
सियालकोटपासून बातम्या अशा येत होत्या कि तिथल्या लोकांना ते धाक दाखून ते बाहेर काढतात...
नुसते बाहेर काढत नाहीत जी माणस जीव मुठीत घेऊन निघालीत त्यांची घर त्यांनी लुबड्लीत...
त्यांचे दागिने ताब्यात घेतले..
त्यांची शेती मुसलमानांनी त्यांचा ताब्यात घेतली...
मुस्लीम लीग कपड्यापलीकडे हिंदुना काहीही घेऊन जाऊ देत नवते.
आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीवर्ती हल्ला करून जमतील
तेवढ्या बाईका ते पळवत.
छोट्या मुलीसुद्धा पळवल्या जात बलात्कार झाल्याशिवाय एकाही हिन्दू
स्त्रीची तिथून सुटका होत नव्हती, बलात्कार झाल्याशिवाय ,,,,,,,?
न्यायमूर्ती कपुरांनी त्यांचा पुस्तकात लिहलय...
ज्या बाईका शिल्लक राहून आल्या त्या डॉक्टरी तपासणी करायला घाबरत होत्या.त्यांना विचारला तुम्ही का घाबरता?
"त्या म्हणाल्या आम्ही की सांगणार आम्हाला काय झाला ते....
" आमच्यावर किती बलात्कार झालेत हे आम्हालाही माहित नाहीये.
कपूर लिहतात त्यांचा सगळ्या अंगावरती गोंदून पाठवलं होत
"आझादी का तोफा".ते सांगतात ज्या भागातून आम्ही जाणार नाही असे म्हणतो
कि तिथे हिंदूंच्या बायकांना पकडून त्यांची धिंड काढली जाते.
हिंदू बायकांचा तिथे बाजार सारखा लिलाव केला जातो..
१९४७ च्या नंतर दिल्लीमध्ये ४००००० निर्वासित आले...
आणि ह्या ४००००० हिंदुना ज्या पद्धतीने पाठवलं होत
अन्याय करून आमची माणसे परत पाठवतोय म्हंटल्यावर तरीही त्या पाकिस्तानला
५५ कोटी रुपये दिले पाहिजेत असा महात्माजींचा,,? आग्रह होतां..
कारण एक तृतीयांश भारत जर तुटला असेल तर,,,,
भारताच्या खजिन्याताला एक तृतीयांश भागावर त्यांचा अधिकार आहे...
हि नैतिकता त्यात येणार होती....
आणि मग जर खाजिन्यावर हक्क ते सांगत असतील तर ,,,,,,
सगळ्या विधीमंडळाने पूर्ण निषेध केला. पाकिस्तानला पैसा देणार नाही.
आणि हे ऐकल्यावर,,,
बिर्ला भवनातल्या पटांगणावर महात्माजी उपोषणाला बसले..
त्यांना पैसे द्या नाही तर मी मरीन....
एका बाजूला गांधी तोंडाने सांगतात मला हिंसा आवडत नाही आणि दुसर्या बाजूला जे हिंसा करतात त्यांना पैसे देण्यासाठी त्यांचा उपोषण आहे...
एका बाजूला म्हणतात अहिंसा आवडते
तर जे हिन्दू अहिंसेने वागले त्यांचा आयुष्य उडून लावायचे प्रयत्न चाललेत..
या ४००००० निर्वासितांची दिल्ली मध्ये कोणतीही व्यवस्था केली नव्हती .
ह्यापेक्षा फार वाईट परिस्थिती अशी झाली कि
दिल्ली मध्ये मोकळ्या असलेल्या मशिदींचा आश्रय हिंदू कुटुंबांनी घेतला...
तेव्हा गांधीनी बिर्ला भावातील भाषणातून सांगायला सुरवात केली
"दिल्ली पोलिसांना माझी आज्ञा राहील माशिदिन सारख्या गोष्टींचा ताबा हिंदूंच्या निर्वासितांनी घेता कामा नये.
निर्वासितांना बाहेर काढून मशिदी मोकळ्या करा".
कारण मित्रानो त्यांच्या लेखी
जीव फक्त मुसलमानांना होता हिंदूंना जीव नव्हता ,,,,,,.
जानेवारीच्या थंडी मध्ये हिंदूंची बाईका पोर ६ ७ महिन्यांची कच्ची बच्ची
हाताला धरून पोलिसांनी बाहेर काढली रस्त्यात गटाराच्या कडेला राहा
तुम्ही छप्राखाली नाही राहायच कारण तुम्ही हिंदू आहात..
४००००० माणस भारतच्या बाहेरून आली होती भारतामध्ये.
ह माझा आहे भारत हे कळण्यासाठी...
हि सगळी माणसं गांधीना भेटायला बिर्ला भावनावर गेली
कि गांधींचं माईक लाऊन भाषण चाललेलं असायचा "
हे आले कशाला इथे तिथेच अहिंसात्मक प्रतिकार करून मेले का नाहीत???
हे शब्द आहेत त्या अहिंसेच्या पुजर्याचे ,,,,,,,,
तुम्ही तुमची घर दार  विकून इथे निघून आलात वेड्या सारखे
हाच अपराध केलात अजूनही तिकडे जा.....
कुठल्या आशेवरती आणि वर ५५ कोटींची दक्षिणा द्यायची पाकिस्तानला?????
बर वल्लभ भाईंनी हे सुद्धा सांगितल होत गांधीजी खजिन्यतला भाग द्यायला हरकत नसते.
पण भावाला जर इस्टेटितला हिस्सा हवा असेल तर ,,,
कर्जाचा हि हिस्सा घ्यावा लागतो.
गांधीजी म्हणाले बरोबर , वल्लभ भाई म्हणाले मग गांधीजी,,,?
दुसर्या महायुद्धाच्या वेळेला आपल्या देशानी ११० कोटी कर्जरुपी उभे केले होते.
त्यातल एक तृतीयांश कर्ज पाकिस्तानला द्यायला सांगा...
जर तुम्ही ब्यारीस्टर आहात कायदेतज्ञ आहात.
तुम्हाला कायदा कळतो...
गांधीजी म्हणाले मी ऐकणार नाही...
सिंधू नदी फाडून सगळ प्रकरण संपल्यावर मात्र मग,,,,,,,,,
नथुरामजी म्हणाले मीच ठरवल ह्याला आता जगू द्यायचा नाही.
कारण आतंकवादी दुसर्याचा शरीराची भीती दाखवतात गुन्हेगार सोडा नाहीतर यांना मारीन...
हा दुसर्या प्रकारचा आतंकवाद होता गुन्हेगारांना पैसे द्या नाही तर मी मरीन.
नथुरामजिनी त्याच वेळी ठरवल ह्याला आता जगू द्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत..
अनेकांची कल्पना अशी आहे की सावरकरांच्या आशीर्वादाने हे झालं
पण तो नथुरामजीनचा अपमान होईल...
कोणाचाही आदेश नाही नथुराम स्वतः सांगतात मी दिल्लीला असताना जे पाहत होतो
जे अनुभवत होतो त्याच वेळी ठरवल होत.
लक्षात ठेवा वाईट पण फक्त नथुरामजींच्या डोक्यावर आल पण
त्या काळात पटेल नेहरूच नवे तर सगळ्यांचा घोषणा देऊन मोर्चे चाललेले
"गांधी को मरने दो हमे हमारा राज्य देदो".
सगळ्यांची इच्छा त्यावेळेला तीच होती.
आणि नथुरामजी तेव्हाही सांगत होते;
"ते भीष्माचार्य आहेत ते द्रोणाचार्य आहेत त्यांचं काम मोठ आहे ते पवित्र आहेत पण,,
दुर्दैवाने ते कौरवांना संवरक्षण देतात म्हणून थांबवायला लागतंय."
आणि त्यानी स्वतः पिस्तुल ६ जणांनी मिळवलं 
(नथुराम गोडसे, नाना आपटे, गोपाळ गोडसे, करकरे, मदनलाल पाहावा, शंकर किस्तया .)
ह्यातल्या मदनलाल वर काम अस दिल होत २० जानेवारीला
त्यांनी बिर्ला भवनातल्या बागेमध्ये बॉम्बस्फोट करायचा
आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन गोळ्या घातल्या जाव्यात.
२० जानेवारीला बॉम्बस्फोट झाला पण जेवढी हवी तेवढी गडबड झाली नाही तो दिवस तसाच गेला...
आणि मग दिवस ठरला ३० जानेवारी....
आता लोकांनी त्यावेळेला इच्छा प्रकट केली नथुराम ३० जानेवारीच का???
आणि नथुरामनी दिलेल वक्तव्य ऐका कोर्टाने सुद्धा ते मान्य केलय कि नथुराम खर बोलतोय.
नथुराम म्हणाले
" जानेवारीच्या मध्याला हैदराबादच्या निजामाचे मंत्री गांधीना भेटले..
आणि हैद्राबाद संस्थान आम्हीच भारतात विलीन करणार नाही
आम्हाला भारतात राहून स्वायत्त राज्य बनवण्याची मागणी केलीये...
आता पर्यंतच्या इतिहासप्रमाणे हि जर मागणी शासनाने नाकारली तर,,,,,
फेब्रुवारीमध्ये पुन्हा गांधींचं दुसरं उपोषण सुरु होणार आणि ,,,
दुसरं पाकिस्तान आपल्या पोटात जन्माला येणार हैदराबाद...?
आता पर्यंतचा इतिहास पाहता हैद्राबादला ते नाही म्हणतील हे शक्यच नव्हत .....
हे सगळा नथुराम सांगू शकले कारण हैदराबादचा मुक्ती संग्राम नथुरामनी भोगला होता...
३८ साली जेव्हा हैद्राबाद म्हणजे पूर्वीचे भागानागर..
ह्या भागानागारात जेव्हा हिंदूंवरती प्रचंड अत्याचार चालले होते
तेव्हा सावरकरांनी आदेश दिल्यानंतर १२०० स्वयंसेवकांच पथक घेऊन हैद्रबाद मध्ये घुसणारी हिंदूंची पहिली तुकडी नथुराम गोडसेंची होती...
नुसती तुकडी घुसवली असा नव्हे तर तिकडच्या हिंदू राष्ट्र दलाच्या कार्यकर्त्यांनी हैद्राबाद मध्ये प्रचंड मोर्चे काढले..
वंदे मातरम हा शब्द म्हटल्या नंतर वेताच्या फटक्यांची शिक्षा होती हैद्राबाद मध्ये निजामाने केलेली....
वंदे मातरम म्हटल्याबद्दल २७ वेताचे फटके स्वतः नथुरामजिनी खाल्येत  
डॉक्टर रिपोर्ट मध्ये २७ ठिकाणी वळ आहेत...
बर तो तुरुंगातला वेत आहे घरातला नाही..
ज्याला धार लावलेली असते जो चामाडीत  घुसतो आणि ओढून काढावा लागतो
अशा वेताच्या छड्या खाल्ल्यात...
नेता कसा असावा हे त्यावेळेला कळलं
पण कुठल्याच बाजूने पाठींबा मिळाला नाही तेव्हा  आंदोलन मागे घ्याव लागल.
आता पर्यंतचा इतिहासाचा विचार केला असता फेब्रुवारीमध्ये दुसरं पाकिस्तान जन्म घेणार
आता घाई केली पाहिजे म्हणून संपूर्ण तयारीनिशी ३० जानेवारीला
बिर्ला भवनापाशी आलेले आहेत नथुरामजी...
आधी बिर्ला मंदिरात जाऊन देवच दर्शन घेतल...
पिस्तुल हातात घेऊन गर्दी मध्ये थांबून राहिले गांधीजी येईपर्यंत...
दोन मुलींच्या खांद्यावर हात ठेऊन गांधीजी आले...
भाषणं साठी काम सुरु व्हायचं होत.
नाना आपटे आणि करकरे हे तिथेच उभे राहिले रस्त्यावरती कारण लोकांना बाजूला करायचा काम त्यांचाकडे होत.
नाना आपटे उत्तम गुजराती बोलू शकत होते त्यांची तिथे गरज होती कारण गुजराती जमाव बराच होता.....
नथुरामजिनी पिस्तुलसुद्धा असा घेतल होता की फार काम कराव लागणार नाही
एक खटका ओढला कि सलग ३ गोळ्या सुटल्या पाहिजेत....
गांधीजी समोर आले तसे नथुरामजिनी नमस्कार केला खाली वाकून...
आपल्या राष्ट्रसेवेला वंदन पण देशाच्या फाळणी मध्ये  झालेल्या लोकांची
अवहेलना करून शत्रूला ५५ कोटी रुपये देण्याच्या मागे आहात
ह्या राष्ट्रद्रोहा बद्दल कोणीही भारतीय नागरिक सहन करू शकणार नाही...
क्षमा करा म्हणून दोन पाउल मागे जाऊन
खटकन खटका ओढला ३ गोळ्या सटसट काळजात घुसल्या...
लोक सांगतात ते "हे राम" म्हणाले पण नथुराम म्हणतात त्यांना काहीच बोलायला वेळच मिळाला नाही....
अशा प्रकारे गांधीचावध झाला....हो वधच ह खुन नव्हे 
आणि भारता वरच मोठ अरिष्ट नथुरामजिनी दूर केल....
सकाळी ७.३० उठवल फाशीच्या तख्तावर उभं केल
मरतानाची शेवटची इच्छा होती त्त्यांची,,,,
हातात अखंड भारताचा नकाशा भगवा ध्वज घेऊन मरायचंय त्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या गेल्या...
फाशी शिक्षा होतेय हे माहित असतानाही नथुरामजींच्या डोळ्यात भीतीचा लवलेश नव्हता
पाणी नव्हते..... ८.०० वर काटा आल्याक्षणी
खटका ओढला दोर्या आवळल्या गेल्या धप्पदिशी खड्डयात गेले आणि
नथुरामजीनचा देह फाशीचा हिसका बसल्यानंतरही शेवटची घोषणा करून गेला
"अखंड भारत अमर रहे"......
अगर काश्मीर का भी दान होगा तो निश्चय हे और एक नथुराम होगा.....
हे गांधीवधाच सत्य होत... गांधीजींना त्यांचा चुकांची शिक्षा आपला जीव गमावून करावी लागली...
देशभक्ती हे पाप असे जर तर मी पापी घोर भयंकर मात्र पुण्य ते असेल माझा नम्र तरी अधिकार तयावर ,,,,,,
लक्षात ठेवा आजही नथू रामजिंच्या  अस्थि अजूनही
सिन्धु नदीत विसर्जित करायच्या शिल्लक आहेत
हे पाप घेवुन आपण स्वातंत्र्य उपभोगायच,,,,,,,,,?

|| नथू रामाय  नमः||